सासवड (जिल्हा पुणे) येथे २६ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

सासवड (जिल्हा पुणे) – सातारा येथून कोंढवा येथे कत्तलीसाठी गोवंशियांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे, ही बातमी अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक ऋषिकेश कामथे, प्रतिक कांचन आदींना समजली.

१० फेब्रुवारी या दिवशी येथील सासवड-जेजुरी मार्गावर गेले असता त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने टेंपोमधून एकूण ११ लहान रेडके आणि १५ म्हशी विनापरवाना घेऊन जात असल्याचे आढळले. (गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहन जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ? हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे. – संपादक) याविषयी सासवड पोलिसांना कळवले असता, पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करून वाहनांसह १० लाख ३७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक अमीर मुलाणी आणि सोहेल मुलाणी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !