अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते ! – रितेश कश्यप, पत्रकार, पांचजन्य, झारखंड
झारखंड राज्यात राजधानी रांचीसह, दुमका, जामताडा, गढवा, पलामू, पाकूर, बोकारो आदी जिल्ह्यांत सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी देणे, हिंदीऐवजी उर्दूला प्राधान्य देणे, या गोष्टी सामाजिक माध्यमे तथा प्रसारमाध्यमांतून उजेडात आल्या. सरकारी आदेशाविना केवळ संख्याबळाच्या आधारे कट्टर मुसलमानांकडून शेकडो शाळांमध्ये गेली १० ते २५ वर्षे हे घडवून आणले जात आहे. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.