बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक
बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता. बेंगळुरूमध्येच सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता.
NIA ने बेंगलुरु से संदिग्ध आतंकी को गिरफ्तार किया: सॉफ्टवेयर इंजीनियर के रूप में काम करता था, 2 साल से अल-कायदा के संपर्क में था; ISIS में शामिल होना चाहता था#NIA #Bengaluru #terrorists https://t.co/NwqT0XjMpk
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) February 11, 2023
एन्.आय.ए.ने सांगितले की, आरिफ हा कट्टरपंथी आहे, तथापि तो आतापर्यंत कोणत्याही घटनेत सहभागी नाही. तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तान येथे जाण्याच्या सिद्धतेत होता.