प्रत्‍येक साधकाच्‍या अंतर्मनात  सदैव विद्यमान असलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

कु. रजनीगंधा कुर्‍हे

‘२८.४.२०२२ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या वाढदिवसाविषयी माझ्‍या मनात पुढील विचार आले, ‘काही वर्षांनंतर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे पुण्‍यस्‍मरण कसे करणार ? श्रीराम आणि श्रीकृष्‍ण हे अवतार आजही प्रत्‍येक जिवाच्‍या हृदयमंदिरात चिरंजीवस्‍वरूपात अजरामर आहेत. त्‍याचप्रमाणे परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमहाविष्‍णूचे अवतार असून ते प्रत्‍येक साधकाच्‍या मनात अजरामर रहातील. देहाला आरंभ आणि अंत असून काळाच्‍या मर्यादा असू शकतात; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ना आरंभ आहे, ना अंत ! ते कालातीत आहेत; कारण ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले’ हे एक तत्त्व आहे. त्‍याला आदि नाही आणि अंतही नाही. ते तत्त्व प्रत्‍येक साधकाच्‍या अंतर्मनात तिन्‍ही त्रिकाळ सदैव विद्यमान आहे आणि राहील !’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक