उंटुरुकट्टे कैमर (कर्नाटक) येथील शासकीय शाळेतील ‘मुलांचा बाजार मेळाव्‍या’त सनातनच्‍या बालसाधिकेचा सहभाग

सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे वितरण करतांना कु. बिंबिता

शिमोगा तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – शिमोगा तीर्थहळ्ळी तालुक्‍यातील उंटुरुकट्टे कैमर येथील शासकीय वरिष्‍ठ प्राथमिक शाळेत ‘मुलांचा बाजार मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. यात सनातन संस्‍थेचे साधक श्री. हरिश यांची कन्‍या कु. बिंबिता हिने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावले होते. या मेळाव्‍यात आजूबाजूचे ग्रामस्‍थ आणि  विद्यार्थ्‍यांचे पालक यांना आमंत्रित करून या बाजार मेळाव्‍यात खरेदीसाठी प्रोत्‍साहित करण्‍यात आले. त्‍यामुळे या मेळाव्‍याला आणि प्रदर्शनाला आजूबाजूच्‍या ग्रामस्‍थांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी शाळेचे अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षही उपस्‍थित होते.