स्वतंत्र ‘आंबा बोर्डा’साठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक प्रावधान ! – उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी विमानतळाचे ‘लोकमान्य टिळक विमानतळ’ असे होणार नामकरण
रत्नागिरी – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक प्रावधान करण्यात आले आहे. ८ दिवसांत त्याविषयी अध्यादेश निघेल. रत्नागिरी विमानतळाचे नामकरण ‘लोकमान्य टिळक विमानतळ’ असे करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. गूगलवर शोध घेतला तर, तेथेे लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव दिसते; मात्र, ते अधिकृत नाही. आता याविषयी आम्ही अधिकृत निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘ऑनलाईन’ झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री सामंत पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकतेच महत्त्वाच्या ४ बैठका झाल्या. याला सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. आंबा बागायतदारांसाठी ‘स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना’ करण्याचा पहिला ठोस निर्णय घेण्यात आला.