हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करणे यांसाठी कोल्हापूर येथे १२ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र- जागृती सभा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर – हिंदूंवर होणार्या विविध स्वरूपाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी १२ फेब्रुवारीला पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे.
या सभेत सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी ९ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते. या सभेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भाजप कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन तोडकर यांनी पाठिंबा घोषित केला आहे.