५२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) हिला पडलेली वैशिष्ट्यपूर्ण स्वप्ने !
१. सनातन पंचांगातील श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्ण समोरच्या भिंतीत जातांना दिसणे आणि नंतर श्रीकृष्ण पुन्हा सनातन पंचांगातील श्रीकृष्णाच्या चित्रात जातांना दिसणे
‘१९.९.२०२० या दिवशी कल्याणी मला म्हणाली, ‘‘आई, मी काल दुपारी १ ते २.३० या वेळेत अभ्यास करत होते. तेव्हा मला घरातील सनातन पंचांगातील श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्ण समोरच्या भिंतीत जातांना दिसला आणि नंतर पुन्हा सनातन पंचांगातील श्रीकृष्णाच्या चित्रात जातांना दिसला. श्रीकृष्णाचा रंग निळा होता.’’
२. गुरु-शिष्य या चित्रातील गुरु, भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वाद देऊन तिघांची एकत्रित शक्ती असलेली एक जादूची छडी देणे अन् त्या छडीत वाईट शक्तींना सत्संग देऊन त्यांना चांगले साधक बनवण्याची शक्ती असल्याचे त्यांनी सांगणे
एकदा कल्याणी मला म्हणाली, ‘‘आई, मला एक स्वप्न पडले. त्यात मला दिसले, ‘मला पंख आहेत. मी अंबरनाथ येथून गोव्याला उडत उडत गेले. नंतर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. नंतर मला साधू (गुरु-शिष्य चित्रातील गुरु) दिसले. मला प.पू. भक्तराज महाराज (आबा) आणि परात्पर गुरु डॉक्टरही दिसले. गुरु-शिष्य चित्रातील गुरु, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांनी मला आशीर्वाद दिला. त्या तिघांनी सर्वांच्या एकत्रित शक्तीची एक जादूची छडी मला दिली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘याचा चांगला वापर कर. त्या छडीत वाईट शक्तींना सत्संग देऊन त्यांना चांगले साधक बनवण्याची शक्ती आहे.’
३. कल्याणीने येणार्या काळाविषयी सांगितलेली तिला जाणवलेली सूत्रे
अ. आपल्याकडचे (भारतातील) लोक औषधे शोधतील आणि इतर देशांना देतील. पंतप्रधान मोदी पोलीस, नगरपालिका, सैन्य सगळ्यांना समवेत घेतील. कोरोना महामारीच्या संकटामुळे सगळे धुऊन जाईल. श्री गणपतीने मला सांगितले, ‘तो दुष्ट शक्ती नष्ट करील. यात दुष्ट माणसांना शिक्षा होईल. चांगल्या माणसांना न्याय मिळेल.’
आ. पुष्कळ पाणी येईल आणि सगळे वाहून जाईल. नवीन गवत आणि झाडे उगवतील. त्याला फुले येऊन तीही जातील. नंतर पुन्हा झाडे उगवतील. सगळे सैनिक मित्र घेऊन मोदी सगळ्यांना साहाय्य करतील. काही लोक ऐकणार नाहीत; पण नंतर त्यांनाही कळेल की, ‘मोदी बरोबर आहेत.’ ते लोकांना सगळीकडे झाडे लावायला सांगतील. अनेक जण त्यांचे ऐकतील.’
– सौ. श्रावणी फाटक (कल्याणीची आई), अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (सप्टेंबर २०२०)
|