सद़्गुरु राजेंद्र शिंदे (सद़्गुरु दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त देवद, पनवेल सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी यांनी काव्यरूपाने व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘भाद्रपद शुक्ल षष्ठी (२.९.२०२२) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने मला सुचलेली कृतज्ञतारूपी कविता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी अर्पण करते. ही कविता मला गुरुमाऊलीनेच सुचवली आणि माझ्याकडून लिहून घेतली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ही कविता सुचल्यावर ‘सद़्गुरु दादा आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, असा भाव कवितेतून प्रकट होत होता.’
काय सांगू मनमोहना ।
काय सांगू मनमोहना (टीप १), जातो कसा दिवस ।
तुझ्या दर्शनावाचून, जीव होई कासावीस ॥ १ ॥
तुझी मधुर वाणी ऐकता, होई बासरीच्या धुनेची आठवण ।
प्रत्येक शब्द जणू अमूल्य मोती, करतो आम्ही हृदयात साठवण ॥ २ ॥
निखळ मधुर हास्य तुझे, जणू चैतन्याचा झरा ।
आनंदले साधक जन, आनंदली ही धरा ॥ ३ ॥
प्रीतीमय नयन हे, करती प्रेमाची पखरण ।
उल्हासित होई मन, जसे पहिल्या पावसाने अंगण ॥ ४ ॥
दोन शब्द तुझे, दोन क्षण सत्संगाचे ।
पुरेसे आहे दिवसभर भावावस्था अनुभवण्यास ॥ ५ ॥
लीला (टीप २) बहुत तुझ्या, करूनी तू नामानिराळा ।
राहूनी सगळ्यात तू, तरी आहेस किती वेगळा ॥ ६ ॥
तळमळ तुझीच अधिक, सवंगड्यांशी प्रीतीची ।
हात धरूनी चालविशी, वाट दावी मुक्तीची ॥ ७ ॥
विचारपूस केली नाहीस, तरी विचार माझा नक्की कर ।
सोडला जरी मी हात तुझा, तरी तू माझा हात घट्ट धर (टीप ३) ॥ ८ ॥
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद़्गुरु राजेंद्र शिंदे
टीप २ – व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आणि त्यातील गृहपाठ
टीप ३ – विचार माझा नक्की कर, हात घट्ट धर म्हणजे माझ्यावर अखंड कृपादृष्टी राहू दे, साधनेत मला सतत मार्गदर्शन कर.
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |