भगवान ब्रह्मदेव, विष्णु आणि शिव यांनी निर्माण केलेला ‘अक्षयवट’ औरंगजेबाला नष्ट न करता येणे !
‘भगवान ब्रह्मदेवाने पृथ्वी वाचवण्यासाठी प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे एक मोठा यज्ञ केला होता. याचे त्यांनी स्वतः पौरोहित्य केले होते. भगवान विष्णु यजमान आणि भगवान शिव त्या यज्ञाचे देवता झाले होते. तेव्हा शेवटी या त्रिदेवांनी दैवीशक्तीने पृथ्वीवरील पापाचे ओझे हलके करण्यासाठी एक वृक्ष निर्माण केला. ते एक वडाचे झाड होते, ज्याला आज ‘अक्षयवट’ नावाने ओळखले जाते. हा वृक्ष अजूनही अस्तित्वात आहे. औरंगजेबाने या वृृक्षाला कुदळीने खोदले, आग लावून जाळले आणि त्याच्या मुळांमध्ये पाराही ओतला; परंतु दैवी वरदान प्राप्त असलेला अक्षयवट आजही दिमाखात उभा आहे. औरंगजेबाने हा वृक्ष जाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या खुणा आजही दिसून येतात.’
– लोकेश भारद्वाज (साभार : ‘कुम्भ-दर्शनम्’, फेब्रुवारी २०१९)