रोपांवर अल्प प्रमाणात लागलेली कीड केवळ पाण्याच्या फवार्याने धुवून घालवावी !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
लेखांक ७६
‘रोपांवर मावा, पांढरी माशी अशा किडींचा संसर्ग अल्प प्रमाणात असतांनाच पाण्याच्या फवार्याने रोपाचा तो भाग धुवून टाकावा. यासाठी तुषार सिंचनाच्या (‘स्प्रे’च्या) बाटलीचा उपयोग करावा. मावा अगदीच चिकट असेल, तर दात घासण्याच्या जुन्या ब्रशने (टूथ ब्रशने) घासून तो काढून टाकावा. काही वेळा या साध्या उपायानेही कीडनियंत्रण होते आणि अन्य काही फवारण्याची आवश्यकता भासत नाही.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.१.२०२३)