मोहक सुंदर देव माझा ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मोहक सुंदर देव (टीप) माझा ।
सृष्‍टीत तो एकमेव सार्‍या ॥ १ ॥

सौ. स्वाती शिंदे

त्‍याच्‍या दर्शनासाठी धडपड सार्‍यांची ।
पण होण्‍या दर्शन पुण्‍य लागे गाठी ॥ २ ॥

पाण्‍याविना मासा जैसा ।
जीव तगमगे तैसा ॥ ३ ॥

देवा, आवरून तुझी माया ।
ये धावून दर्शन देण्‍या ॥ ४ ॥

टीप : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– सौ. स्‍वाती शिंदे (वय ३५ वर्षे) (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक