पनवेल येथे १२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
पनवेल – हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी यांसाठी येथे १२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने येथे ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषद पार पडली. परिषदेला तालुक्यातील ११ वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार आणि रणरागिणी शाखेच्या समन्वयक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी माहिती दिली.
श्री. सागर चोपदार म्हणाले, ‘‘पनवेलसह रायगडमधील विविध भागांत मोठ्या प्रमाणात हिंदु बांधवांचे धर्मांतर होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा लाभलेल्या आपल्या जिल्ह्यातील रायगड, कुलाबा आदी गडदुर्गांवर इस्लामी अतिक्रमणे करून एकप्रकारचा लँड जिहाद चालू आहे. लँड जिहाद यांसारखे हिंदूंवरील विविध आघात रोखण्यासह हिंदूंना पुन्हा एकदा सन्मानाने जगण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याची आवश्यकता असून या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर जनजागृती केली जात आहे.’’
पनवेल पंचक्रोशीसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांत या सभेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला असून समस्त हिंदुत्वनिष्ठांनी ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. बैठका, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स फलक, तसेच सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सभेचा प्रसार करण्यात येत आहे.
आज वाहनफेरी !
सभेच्या जनजागृतीसाठी १० फेब्रुवारीला पनवेलमध्ये भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर http://fb.com/JagoHinduRaigad या link द्वारे पहाता येणार आहे. सभेला हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.