त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फ हा ३ पुजार्यांनी केलेला बनाव !
देवस्थान समितीच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !
नाशिक – ३० जून २०२२ या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा होत होता; मात्र हा बर्फ म्हणजे पुजार्यांनी केलेला बनाव असल्याचे सत्यशोधन समितीत उघड झाले आहे. या प्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने ३ पुजार्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
पिछले साथ त्र्यंबकेश्वर मंदिर से जुड़ा एक वीडियो वायरल हुआ था. #TrimbakeshwarMandir #ViralVideo https://t.co/8dFFbpU0Pa
— AajTak (@aajtak) February 9, 2023
त्र्यंबकेश्वर येथील हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा निर्माण झाला ? यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही चित्रणाची पहाणी करण्यात आली. त्यात तुंगार विश्वस्तांमधील तिघांनीच पिंडीवर बर्फ ठेवल्याचे समोर आले आहे. ‘अमरनाथप्रमाणेच त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणीही बर्फ निर्माण झाला आहे’, असा खोटा प्रचार केल्याचा ठपका पुजारी सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासरकारीकरण झालेल्या मंदिरांत याहून वेगळे काय घडणार ? सरकारच्या कह्यातून मंदिरे मुक्त केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत ! |