तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !
लोकसभेत भाजपच्या खासदाराविषयी अपशब्द वापरल्याचे प्रकरण
नवी देहली – लोकसभेमध्ये भाजपचे खासदार रमेश बिघुडी यांना उद्देशून अपशब्द वापरणार्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या अपशब्दाविषयी क्षमा मागण्यास नकार दिला आहे. त्यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचा उल्लेख करून म्हटले की, जर त्यांना क्षमा मागणे ऐकायचे असेल, तर त्यांना पुष्कळ वाट पहावी लागेल. मी क्षमा मागण्यापूर्वी भाजपच्या खासदाराने माझी क्षमा मागितली पाहिजे.
#TMC and #BJP members engage in heated exchanges during #LokSabha debate on President’s Address, after #MahuaMoitra uses an offensive word, leading to objections from the Chair.https://t.co/KVDK6fp4rE
— Outlook India (@Outlookindia) February 9, 2023
संपादकीय भूमिकासंसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते ! |