खलिस्तानवाद्यांनी लुटले पोलिसांचे साहित्य आणि शस्त्र !
चंडीगड येथे खलिस्तानवाद्यांकडून मोठा हिंसाचार
चंडीगड – येथील चंडीगड-मोहाली सीमेवर ८ फेब्रुवारीला खलिस्तानवादी शिखांनी मोठा हिंसाचार केला. ते शिक्षा पूर्ण झालेल्या शीख बंदीवानांची सुटका केली जावी, या मागणीसाठी आंदोलन करत होते. त्या वेळी त्यांनी चंडीगडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले. त्या वेळी आंदोलक शिखांनी पोलिसांवर तलवार आणि लाठी यांद्वारे आक्रमण केले. पोलिसांकडील ढाल, शिरस्त्राण, शस्त्रे आणि अश्रुधुराची नळकांडी लुटले. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या आंदोलनामध्ये १२ खलिस्तान समर्थक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्या आंदोलनाच्या वेळी खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देत होत्या. हे आंदोलन आणि हिंसाचार हा सुनियोजित कट होता.
चंडीगढ़ हिंसा में बड़ा खुलासा: पुलिस बोली- प्रदर्शनकारियों ने हथियार, टियर गैस ग्रेनेड लूटे, प्रदर्शन में 12 प्रो-खालिस्तानी संगठन, प्रबंधकों पर FIR#Chandigarh #Sikh #Protest https://t.co/peshyWlBu4 pic.twitter.com/n79IJBslk1
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) February 9, 2023
संपादकीय भूमिकापंजाबमधील खलिस्तानवाद्यांची वळवळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उद्या यामुळे मोठी हानी होण्यापूर्वीच केंद्र सरकारने कठोर पावले उचलून ती चिरडणे आवश्यक आहे ! |