दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या काणकोण येथे थांबा घेणार ! – रमेश तवडकर, सभापती


पणजी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या लवकरच काणकोण येथे थांबा घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी दिले आहे, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची देहली येथे भेट घेतल्यानंतर सभापती रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली.

काणकोण येथील नागरिकांनी दीर्घ पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी काणकोण येथे थांबा घ्यावा, यासाठी नुकतेच आंदोलन छेडले होते.

हे वाचा :सनातन प्रभात 

काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांवबण्यासाठी आंदोलन