काँग्रेसच्या नेत्या शोभा बच्छाव यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद !
नाशिक येथे विनाअनुमती आंदोलन केल्याचे प्रकरण
नाशिक – केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत अदानी उद्योगसमूहावर केंद्र सरकारची ‘कृपादृष्टी’ असल्याचा आरोप करत काँग्रेसने आंदोलन केले; मात्र विनाअनुमती आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील आणि बबलू खैरे यांच्यासह नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.