भारतातील २३८ शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध !
नवी देहली – दूरसंचार सेवा पुरवणार्या आस्थापनांनी ५ जी सेवा पुरवण्यास आरंभ केला आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून आस्थापनांनी भ्रमणभाषशी संबंधित ५ जी सेवा पुरवण्यास आरंभ केला असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत देशातील २३८ शहरांमध्ये ही सेवा पुरवण्यात आली आहे.