नागपूर येथे तरुणाच्या हत्येप्रकरणी ७ जणांना जन्मठेप !
नागपूर – एका तरुणाच्या हत्येप्रकरणी येथील विशेष अॅट्रॉसिटी न्यायालयाने ७ फेब्रुवारी या दिवशी ७ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरण उपाख्य विकी मेश्राम असे मृताचे नाव आहे. शंकर सोळंकी, देवीलाल सोळंकी, सूरज राठोड, रमेश सोळंकी, यश लखानी, मिखन सलाद आणि मीना सलाद अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
किरण याची मारेकर्यांच्या घरातील एका मुलीशी मैत्री होती; पण तिच्या घरच्यांना ती मैत्री मान्य नव्हती. यावरून दोन्ही कुटुंबियांत वाद होत होते. याच कारणावरून १ मे २०१८ या दिवशी आरोपींनी मेश्राम याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला अमानुष मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला होता.