हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करावेत !
|
अमरावती – हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावेत. सामान्य हिंदूंना साहाय्य करावे. यापुढे आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे कार्यकर्ते देशभरात ‘एक मुठ्ठी चावल’ यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून हिंदूंना साहाय्य करून हिंदु समाजाचे संघटन करण्याचे कार्य करणार आहेत, असे उद़्गार आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रवीण तोगाडिया यांनी काढले. ते येथील संतोषीनगर भागात झालेल्या जाहीर सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद
मी हिंदु जनजागृती समितीला बर्याच वर्षांपासून ओळखतो. हिंदु जनजागृती समितीला माझे नेहमीच सहकार्य असेल, असे गौरवोद़्गार डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी काढले. येथील सभेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी डॉ. प्रवीण तोगाडिया यांची वैयक्तिक भेट घेतली. या वेळी समितीच्या वतीने ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती’ हा ग्रंथ डॉ. प्रवीण तोगाडिया यांना भेट देण्यात आला.