हुबळी-गदग एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित !
सोलापूर – कर्नाटकातील गुळेदगुंड ते बदामी या दुहेरी मार्गचे काम ७ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर ते हुबळी, हुबळी ते सोलापूर, सोलापूर ते गदग, गदग ते सोलापूर एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आली आहे. या समवेतच काही मार्गांत पालट करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून धावणारी गदग एक्सप्रेस बांका घाट स्थानकापर्यंत धावेल आणि तेथून मुंबईकडे सुटेल. साईनगर शिर्डी ते मैसूर एक्सप्रेस ही होटगी मार्गे कलबुर्गी, वाडी, रायचूर, गुंटकल बल्लारी मार्गे धावेल, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.