हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातनचे योगदान मोठे ! – अधिवक्ता प्रेमचंद्र झा, राष्ट्रीय अध्यक्ष, आदित्य वाहिनी
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे होत असलेल्या माघ मेळाव्यामध्ये ‘आदित्य वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली. या वेळी अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांनी सांगितले की, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातन संस्थेचे पुष्कळ मोठे योगदान आहे. या प्रसंगी त्यांना सनातन पंचांग भेट देण्यात आले. अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांनी २५ एप्रिल या दिवशी देहली येथे होणार्या ‘विश्वव्यापी हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आमंत्रण संस्थेच्या साधकांना दिले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. निलय पाठक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.