शालेय अभ्यासक्रमामध्ये अध्यात्माचा समावेश आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
मथुरा (उत्तरप्रदेश) – शालेय अभ्यासक्रमामध्ये अध्यात्माचा समावेश केला, तरच आपल्या संस्कृतीचे रक्षण होऊ शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘राधा माधव इंटर महाविद्यालया’मध्ये शिक्षकांना ३० जानेवारी या दिवशी केले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.