९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार !
-
२७ फेब्रुवारीपासून विधीमंडळ अधिवेशन
-
१५ मार्चपर्यंत अधिवेशन चालवले जाण्याची शक्यता
मुंबई, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्याचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प ९ मार्च या दिवशी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत सादर करणार आहेत. तत्पूर्वी ८ मार्च या दिवशी राज्याचा आर्थिक पहाणी अहवाल सादर होईल. अंदाजे १५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवले जाऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांची सुनावणी लवकरच होणार आहे. अधिवेशन कालावधीत या खटल्याचा निवाडा झाल्यास तात्काळ निवडणुका घोषित होऊ शकतात. तसे झाल्यास अधिवेशन गुंडाळले जाऊ शकते, असे वित्त विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.