तुर्कीयेने रहित केला पाकच्या पंतप्रधानांचा दौरा !

भूकंपाच्या साहाय्यता कार्यात व्यस्त असल्याचे दिले कारण !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुर्कीयेमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तत्परतेने साहाय्य पाठवल्यानंतर पाकिस्तानने साहाय्य पाठवण्याचा प्रयत्न केला; मात्र भारताच्या तुलनेत ती नगण्य असल्याने तुर्कीयेला खुश करण्यासाठी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तुर्कीयेला भेट देण्याचे घोषित केले होते; मात्र तुर्कीयेने त्यांची भेट रहित केली आहे. यासाठी तुर्कीये सरकारने साहाय्यता कार्यात व्यस्त असल्याचे कारण दिले आहे. मुळात अशा वेळी या देशाला भेट देण्याची आवश्यकता नाही, हे जगालाही ठाऊक असतांना भारताच्या तुलनेत इस्लामी देश म्हणून दुसर्‍या इस्लामी देशाला साहाय्य करण्याचे दाखवण्यासाठी शरीफ तुर्कीयेला जाण्याचा प्रयत्न करत होते. पाकच्या नागरिकांचा याला विरोध होता.

संपादकीय भूमिका 

काश्मीरच्या सूत्रावर पाकला साहाय्य करणार्‍या तुर्कीयेने पाकला त्याची लायकी दाखवली, हेच यातून स्पष्ट होते !