सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात उपस्थित !
मथुरा – श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात आणण्यात आली. या प्रकरणात २३ जानेवारी या दिवशी सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणातील ६ क्रमांकाचे वादी भगवान केशव महाराज हे अनुपस्थित नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ६ फेब्रुवारी या दिवशी सुनावणीच्या वेळी या प्रकरणांतील सर्व वादी असणारे लोक भगवान केशव महाराज यांची मूर्ती घेऊन न्यायालयात उपस्थित राहिले. या वेळी न्यायालय म्हणाले, ‘‘आम्ही हे मान्य केले आहे की, भगवान केशव महाराज स्वतः न्यायालयात आले आहेत. पुढच्या सुनावणीच्या वेळी त्यांना आणण्याची आवश्यकता नाही.’’ १३ फेब्रुवारी या दिवशी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
सौजन्य टाइम्स नाऊ नवभारत
श्रीकृष्णजन्मभूमीच्या परिसरातील मंदिर तोडून तेथे ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. ज्या ठिकाणी मशीद आहे, तेथे कंसाचे कारागृह होते. तेथेच श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. वर्ष १६६९-७० मध्ये मोगल आक्रमक औरंगजेब याने मंदिर तोडून तेथे मशीद बांधली होती.