काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे ! – योगी आदित्यनाथ
आगरतळा (त्रिपुरा) – ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस लोकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रयत्न करत असते. काँग्रेस राममंदिराचा विरोध करत होती, रामसेतू तोडू इच्छित होती, मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर प्रश्न उपस्थित करत होती. कोळसा घोटाळा आदी घोटाळे काँग्रेसच्या राज्यात झाले आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिपुरा येथील बोर्दोवाली रोड भागात भाजपच्या उमदेवाराच्या प्रसार सभेत केली.