क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद
मुंबई – माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कांबळी यांची पत्नी अँड्रिया यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. मद्यप्राशन करून कांबळी यांनी वांद्रे येथील त्यांच्या घरामध्ये पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे यात म्हटले आहे. (क्रिकेटपटूंना आदर्श मानणार्या तरुणांनो, तुमचे आदर्श क्रांतिकारक असावेत कि क्रिकेट खेळाडू ? याचा गांभीर्याने विचार करा ! – संपादक)