प्रतिदिन स्वयंपाकात फोडणी करतांना लागणारे घटक स्वतःच्या लागवडीत पिकवा !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
लेखांक ७३
‘प्रतिदिन स्वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्या मिरच्या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात. मिरचीची लागवड प्रत्येक ३ – ४ मासांच्या अंतराने पुन्हा करत राहिल्यास वर्षभर मिरच्या मिळतात. मोहरीची रोपे लावून त्याला येणार्या शेंगा परिपक्व होईपर्यंत झाडावरच राहू दिल्या, तर मोहरी मिळू शकते. जागेच्या उपलब्धतेनुसार हळदीची रोपे लावली, तर हळदपूडही घरच्या घरी बनवता येते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.०१.२०२३)
तुमच्या घरी तुम्ही कोणत्या वनस्पतींची लागवड केली आहे, ते आम्हाला कळवा !
ई-मेल पत्ता : lagvadseva@gmail.com