इयत्ता १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत !
नागपूर मेट्रो प्रशासनाचा निर्णय !
नागपूर – येथील मेट्रोच्या चारही मार्गिका चालू झाल्यावर मेट्रोने एका मासात तब्बल ४ वेळा तिकीटदरात वाढ केल्याने विद्यार्थी अप्रसन्न आहेत. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारीपासून तिकीट शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत देण्यात येत आहे. नागपूर मेट्रोच्या चारही मार्गांवर ही सवलत मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ते शिकत असलेली शाळा किंवा महाविद्यालयाचे त्यावर्षीचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.