क्षण तो पहाण्या मी आतुरले ।
हवे मजला गुरुरायांचे
(टीप) दर्शन ।
चालेल, जरी नाही पाहिले
त्यांनी मज ॥ १ ॥
क्षणभर गुरुरूप पाहीन,
त्यात हरवून मी जाईन ।
पहाता त्यांना ‘मी’पणा माझा
मी विसरून जाईन ॥ २ ॥
भेट माझिया देवाची (टीप) ।
घडवावी त्वरा आता साची ॥ ३ ॥
क्षण तो पहाण्या मी आतुरले ।
अंतरातून माझ्या मी व्याकुळले ॥ ४ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– सौ. स्वाती शिंदे (वय ३५ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |