‘इंडियन मुजाहिद्दीन’चे नाव घेत मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी !
दिवसेंदिवस असुरक्षित होणारी मुंबई !
मुंबई – मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचे नाव घेत देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा दूरभाष आला होता. यानंतर विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली. मंत्रालय, महत्त्वाची कार्यालये, स्टॉक एक्स्चेंज, हॉटेल ताज, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, उच्च न्यायालय, हाजीअली दर्गा, पंचतारांकित हॉटेल आदी ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याआधीही बरेचदा मुंबईवर आक्रमण करण्याविषयी धमक्या देण्यात आल्या आहेत.