वय, अनुभव आणि साधना आदी सर्वच गोष्टींत उच्च स्थानी असलेल्या पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांची पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी अनुभवलेली अहंशून्यता !
‘२०.११.२०२२ (कार्तिक कृष्ण एकादशी) या दिवशी माझा ३३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी माझ्याविषयी लिहिलेला एक लेख माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी (१९.११.२०२२ या दिवशी) ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये छापून आला होता. पू. वटकरकाकांनी मला माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आणि वाढदिवसाच्या दिवशी पाठवलेल्या लघुसंदेशातून त्यांची अहंशून्यता माझ्या लक्षात आली. त्याविषयी पुढे दिले आहे.
१. पू. शिवाजी वटकर यांनी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पाठवलेला लघुसंदेश आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी त्यांना कळवलेला नमस्कार !
१ अ. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी केलेली प्रार्थना आणि कृतज्ञता : माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी (१९.११.२०२२ या दिवशी) पू. वटकरकाकांनी मलापुढील लघुसंदेश पाठवला.
पू. शिवाजी वटकर : नमस्कार ! ‘मला तुमच्याविषयी लिहिण्याची संधी मिळाली आणि ते लिहून घेतले’, त्याबद्दल तुमच्या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता ! ‘या लिखाणातून माझ्यासारख्या साधकांना प्रेरणा मिळो आणि तुमच्यासारखे प्रयत्न गुरुमाऊलींनी आमच्याकडून करून घ्यावेत’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार ! ‘तुम्हाला ‘सद़्गुरु माऊली’ या पदावर लवकर विराजमान करावे’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो !
मी (पू. (सौ.) अश्विनी पवार) : आपल्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !
१ आ. वाढदिवसाच्या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी पू. शिवाजी वटकर यांना लघुसंदेश पाठवल्यावर पू. वटकरकाकांनी आशीर्वादरूपी प्रार्थनेचा लघुसंदेश पाठवणे : वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे २०.११.२०२२ या दिवशी पू. वटकरकाकांना मी पुढील लघुसंदेश पाठवला. त्यावर त्यांनी मला आशीर्वादरूपी प्रार्थनेचा लघुसंदेश पाठवला.
मी (पू. (सौ.) अश्विनी) : पू. काका, आजच्या दिवशी तुमच्या चरणी प्रार्थना करते, ‘तुमच्याप्रमाणे मला सतत शिकण्याच्या आणि भावाच्या स्थितीत रहाण्याचा आशीर्वाद मिळावा !’
पू. शिवाजी वटकर : पू. ताई, मी वयोवृद्ध आहे; म्हणून तुम्हाला ‘तथास्तु !’ म्हणत आशीर्वाद देतो. ‘तुम्ही लवकरात लवकर सद़्गुरुपद गाठावे. तुमच्याकडून प्रचंड समष्टी कार्य व्हावे आणि तुमच्याकडून माझ्यासारखे अनेक साधक घडवले जावेत’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी तुमच्या वाढदिवसाच्या मंगलदिनी प्रार्थना करतो.
२. पू. वटकरकाका वय, अनुभव आणि साधना इत्यादी सर्वच गोष्टींत उच्च स्थानी असूनही ते स्वतःला केवळ ‘वयोवृद्ध’ असे संबोधून स्वतःकडे न्यूनता घेण्याच्या स्थितीत आहेत. यातूनच त्यांचे संतत्व मला शिकायला मिळाले.
स्वतः संत असूनही अहंशून्य आणि शिकण्याच्या स्थितीत असणार्या पू. वटकरकाकांच्या चरणी अन् असे संतरत्न घडवणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२३)