मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा !
मुंबई – ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०’नुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने साजरा करण्यात येतो. देशी आणि परदेशी भाषांचे आक्रमण होऊनही मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत आहे; परंतु जगाच्या व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि शिक्षण यांमुळे मराठी माणसांसमोर भविष्याविषयी चिंता व्यक्त करणारे बरेच प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. ते योग्य कि अयोग्य याची चर्चा व्हावी, या हेतूने वृत्तपत्र चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करणार्या ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई’ या संस्थेच्या वतीने ‘मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या’ किंवा ‘जागतिकीकरण आणि मराठी भाषा’ या विषयांवर शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टंकलेखन करून लेख rajandesai759@gmail.com या मेलवर २० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. पारितोषिक वितरण समारंभ रविवार, २६ फेब्रुवारी या दिवशी धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर-पश्चिम येथील ‘मराठी भाषा दिवस कार्यक्रमा’त होईल, अशी माहिती प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी दिली आहे. (अधिक माहितीसाठी संपर्क – ८७७९९८३३९०)