लौकिक गोष्टींत न अडकता ‘ईश्वरप्राप्ती’ हे एकमेव ध्येय ठेवून साधनेत प्रगती करणार्या सनातनच्या साधिका !
‘२ – ३ मासांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘प्रौढ (४० वर्षांहून अधिक वय असलेल्या) कुमारिकांच्या नावांच्या आधी ‘सुश्री (कु.)’ ही उपाधी लावावी !’, ही चौकट प्रसिद्ध झाली. त्यानंतर आरंभी काही साधिकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन करतांना वरील सूचनेप्रमाणे प्रौढ कुमारिकांच्या नावांच्या आधी ‘सुश्री (कु.)’ लावण्यासाठी मी त्यांना त्यांचे वय विचारले आणि ‘आता आपण ‘सुश्री (कु.)’ ही उपाधी लावणार आहोत’, असे त्यांना सांगितले. त्यानंतर मी काही जणींना याविषयी न सांगताच त्यांच्या नावांच्या आधी ‘सुश्री (कु.)’ असे लिहिले. त्यानंतर ते लेख दैनिकात प्रसिद्ध झाले; पण या सर्व प्रक्रियेत एकाही साधिकेने ‘असे प्रसिद्ध करायला नकोे. त्यामुळे ‘आमचे वय जास्त आहे’, हे सर्वांना कळेल’, असे म्हटले नाही; याउलट ‘तुमच्या धोरणाप्रमाणे तुम्ही करा’, असे त्या मला म्हणाल्या.
साधना न करणार्या समाजातील स्त्रियांना त्यांचे वय विचारलेले आवडत नाही, तसेच ‘ते इतरांना कळू नये’, याची काळजी त्या घेत असतात. काही जणींना तर स्वतःचे वय इतरांना कळल्यावर वाईट वाटते. या पार्श्वभूमीवर ‘सनातनच्या साधिका साधनेत किती पुढच्या टप्प्याला पोचल्या आहेत !’, हे लक्षात येते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘आम्ही साधना करत नसतो, तर समाजातील इतर स्त्रियांप्रमाणे लौकिक गोष्टींत अडकलो असतो; पण तुमच्या कृपेने आम्ही साधनेत आलो आणि साधनेतील आनंद घेता आल्याने आम्हाला साधनेव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा विसर पडला. आम्हा साधिकांना लौकिक गोष्टींतून मुक्त करून साधनेत पुढे नेणार्या आणि ‘ईश्वरप्राप्ती’ हे एकमेव ध्येय असल्याचे मनावर बिंबवणार्या आपल्या कोमल चरणी आम्ही सर्व साधिका कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सुश्री (कु.)दीपाली होनप, सनातन आश्रम , रामनाथी गोवा (४.३.२२)