पिंपरी (पुणे) येथे गायींना बेशुद्ध करून कत्तलीसाठी नेणार्या ६ धर्मांधांना अटक !
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी (पुणे) – येथे गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यामध्ये ६ आरोपींना अटक करून २५ लाख २० सहस्र ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मोसीन कुरेशी, महंमद कुरेशी, हाशिम कुरेशी, अशरफ कुरेशी, महंमद अरिफ सुलेमान कुरेशी, सोहेल कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या अन्वेषणात ९ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. या आरोपींना शहरातील इतर तत्सम गोहत्येच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करून त्यांच्यावर मोक्का (मकोका)अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी आणि या आरोपींची पाळेमुळे समूळ नष्ट करावीत, अशी मागणी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने ३१ जानेवारी या दिवशी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिंलिद एकबोटे आणि बजरंग दलाचे गोरक्षक अभिजित चव्हाण, मंगेश नढे, नीलेश चासकर, ऋषि भागवत आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. पिंपरी-चिंचवड येथे मागील २ ते ३ वर्षांत गोवंश चोरून कत्तलीच्या घटना, तसेच भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक करण्याचे १२ ते २० गुन्हे घडले आहेत. त्या संदर्भात दिघी, भोसरी, पिंपरी, सांगवी, आकुर्डी या पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हेही नोंद आहेत.
२. सदर गुन्ह्यातील आरोपींना दिघी पोलिसांनी २८ जानेवारी या दिवशी मुंबई येथून अटक केली असून त्या टोळीतील आरोपींनी ज्या ठिकाणी भुलीचे इंजेक्शन देऊन गोहत्या केलेली आहे, त्या ठिकाणी हत्येची समान पद्धत वापरलेली आहे. त्यात हिंदूंच्या भावना दुखावण्याचा आणि हिंदु धर्माचा अपमान करण्याचे कारस्थान रचण्याचा उद्देश असणार यात शंका नाही.
३. या गोहत्येमधून जमा होणारा पैसा देशद्रोही कारवायांसाठी वापरला जातो. या गुन्ह्यामध्ये अजूनही काही जणांचा समावेश असणार आहे, त्यांनाही लवकरात लवकर पकडून पोलीस कोठडी मिळणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायदा असूनही अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना करावी लागणे दुर्दैवी ! |