(म्हणे) ‘समान नागरी कायदा घटनाविरोधी ठरेल !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा दावा !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समान नागरी कायदा दलित आणि आदिवासी यांची सामाजिक अन् सांस्कृतिक ओळख यांना हानी पोचवेल. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व धर्मांना आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सरकारने सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आघात करू नये. समान नागरी कायदा घटनाविरोधी ठरेल, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने तिच्या येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटले आहे. बोर्डचे अध्यक्ष मौलाना सैयद राबे हसनी नदवी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हेही सहभागी झाले होते. या वेळी ‘धार्मिक पूजास्थळ कायदा रहित केला, तर देशात अराजक निर्माण होईल’, असेही सांगण्यात आले.
AIMPLB Meeting: देश में समान नागरिक संहिता लागू नहीं होने देंगे, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड का ऐलान#AIMPLBMeeting #Uniform
More Updates: https://t.co/YzXGNIsSGL
Read More : 👇👇https://t.co/JgSRvhJgjo
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) February 5, 2023
बोर्डाने म्हटले की, देशात द्वेषाचे विष पसरवले जात आहे आणि त्याला राजकीय हत्यार बनवले जात आहे. हे हानीकारक आहे आणि यामुळे देशातील बंधूभाव नष्ट होईल. त्यातून देशाची हानी होईल. जर ही आग ज्वालामुखी बनली, तर संस्कृती, प्रगती, नैतिकता सर्व काही नष्ट होईल.
संपादकीय भूमिकाकोणताही मुसलमान किंवा त्यांची संघटना कधीही समान नागरी कायद्याचे समर्थन करणार नाही; कारण त्यांना सध्या मिळत असलेल्या सर्व सुविधा यामुळे समाप्त होणार आहेत, हे स्पष्ट आहे ! |