पाकच्या क्वेटा येथील स्टेडियमबाहेरील बसमध्ये तालिबान्यांकडून बाँबस्फोट
क्वेटा (पाकिस्तान) – येथील स्टेडियम जवळील मुसा चौकात बसमध्ये बाँबस्फोट करण्यात आला. या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तान में क्रिकेट मैच के दौरान आतंकी हमला, जोरदार धमाके में बाल-बाल बचे बाबर आजम और अफरीदी#PakistanBlast #BabarAzam #Afridi https://t.co/OlschrHoFp
— Zee News (@ZeeNews) February 5, 2023
स्फोटानंतर स्टेडियमबाहेरील प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक चालू केली. त्यामुळे क्रिकेट सामना थोडा वेळ थांबवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्यांना सुरक्षा पुरवून कक्षात नेण्यात आले.