योगऋषी रामदेवबाबा यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा नोंद !
इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे प्रकरण
बरमार (राजस्थान) – इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून योगऋषी रामदेवबाबा यांच्याविरोधात येथील चौहतान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भा.दं.वि.च्या कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८ अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय म्हणाले होते योगऋषी रामदेवबाबा ?राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात योगऋषी रामदेवबाबा यांनी म्हटले होते की, इस्लाममध्ये ५ वेळा नमाजपठण केल्यावर काहीही करू शकता; मग हिंदु मुलींना उचलून न्या अथवा आतंकवादी बनून मनात येईल ते करा. ५ वेळा नमाजपठण केल्यानंतर ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल, तर अशी जन्नत ‘जहन्नुम’पेक्षा (नरकापेक्षा) वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापे धुतली जातात; पण हिंदु धर्मात असे होत नाही. |