बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील ठाकूरगावातील बलियाडांगी येथे ५ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातांनी येथील १४ मंदिरांवर आक्रमण करून तेथील मूर्तींची तोडफोड केली. तसेच काही मूर्ती तलावात फेकून दिल्या.
रात भर में 14 मंदिरों पर हमला, देवी-देवताओं की मूर्तियों को किया खंडित: निशाना बने सारे मंदिर बांग्लादेश के एक ही जिले में, दहशत में हिंदू#Bangladesh https://t.co/dRsIfaKvgU
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 6, 2023
Bangladesh 🇧🇩 : Extremists vandalized and looted 14 temples in Baliadangi Upazila of Thakurgaon district of Bangladesh. !slamic Extremist tore the pages of Srimad Bhagavad Gita.#BangladeshiHindusUnderAttack @StateIRF pic.twitter.com/FFnrbmR6gN
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) February 6, 2023
________________________________________
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक) |
१. बालिंदंगी उपजिल्हा पूजा सेलिब्रेशन काऊंसिलचे सरचिटणीस बिद्यनाथ बर्मन यांनी सांगितले की, काही मूर्ती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर काही मूर्ती मंदिराच्या ठिकाणी तलावात फेकून देण्यात आल्या आहेत. यामागे नेमके कोण आहे, हे अद्याप उघड झालेले नाही; पण अन्वेषण पूर्ण करत आरोपींना पकडले जावे आणि न्याय व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
२. संघ परिषदचे अध्यक्ष समर चॅटर्जी यांनी सांगितले आहे की, हा परिसर नेहमीच जातीय सलोख्यासाठी ओळखला जातो. याआधी अशी कोणतीही निंदनीय घटना घडलेली नाही. या ठिकाणी मुसलमान समाज बहुसंख्यांक असून त्यांचा हिंदूंसह कोणताही वाद नाही. यामागे नेमके आरोपी कोण आहेत, हे आम्हालाही समजत नाही.
३. ठाकूरगावचे पोलीसप्रमुख जहांगीर हुसेन यांनी सांगितले की, देशातील शांतता बिघडवण्यासाठी हे आकस्मिक आक्रमण करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल.
४. ठाकूरगावचे प्रशासकीय प्रमुख महबूर रहमान यांनी ‘हे आक्रमण शांतता आणि जातीय सलोख्याच्या विरोधात रचलेल्या कटाचा भाग आहे. हा गंभीर गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना कारवाईला सामोरे जावे लागेल’, असे सांगितले.
संपादकीय भूमिकाया घटनेविषयी जगातील कोणत्याही संघटनेकडून निषेध करण्यात आलेला नाही, हे लक्षात घ्या ! अशा प्रकारची घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात भारतात झाली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि मुसलमान अन् ख्रिस्ती रस्त्यावर उतरले असते ! |