रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील तेजतत्त्वाची आणि शक्तीची आलेली प्रचीती !
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना मार्गदर्शन करतांना ‘त्यांच्या बोलण्यातून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असून साधकांवर आलेले आवरण नष्ट होत आहे’, असे जाणवणे
‘हिंदु राष्ट्र अधिवेशनानंतर रामनाथी आश्रमात झालेल्या साधकांच्या एका शिबिराच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांना मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी ‘मारक शक्तीचे प्रक्षेपण होत असून त्यांच्या बोलण्यातून तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी वातावरणातील अनिष्ट शक्तींना त्रास होत आहे आणि साधकांवर आलेले आवरण नष्ट होत आहेे’, असे मला जाणवले.
२. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या केसांतील भांगाकडे पहाण्याचा प्रयोग करतांना ‘भांगातून लालसर केशरी रंगाचे किरण कारंज्याप्रमाणे ऊर्ध्व दिशेला प्रक्षेपित होत आहेत’, असे दिसणे
शिबिराच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या केसांतील भांगाकडे पहाणे’, असा सूक्ष्मातील एक प्रयोग करण्यात आला. त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या भांगातून लालसर केशरी रंगाचे किरण कारंज्याप्रमाणे ऊर्ध्व दिशेला प्रक्षेपित होत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई मला दुर्गादेवीच्या रूपात दिसल्या. इतर वेळी त्या मला महालक्ष्मीच्या रूपात दिसतात.’
– सौ. तनुश्री साहा, कोलकाता, बंगाल. (१३.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |