रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेला धर्मध्वजाच्या पूजनाचा अभूतपूर्व आणि अविस्मरणीय सोहळा अन् त्या वेळी आलेल्या अनुभूती
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाचे पूजन करून त्याचे आरोहण (फडकावणे) केले. या धर्मध्वजाच्या एका बाजूला सिंहासनाधिष्ठित प्रभु श्रीराम आणि दुसर्या बाजूला श्रीराम रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र आहे. हा अभूतपूर्व सोहळा पहातांना कोलकाता येथील साधिका सौ. तनुश्री साहा यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सद़्गुरु आणि संत यांच्या उपस्थितीमुळे वातावरण चैतन्यमय होणे अन् ‘महालक्ष्मीस्वरूप दिसणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चेहर्यावरील स्मितहास्य साधकांना आश्वस्त करत आहे’, असे वाटणे
‘धर्मध्वजाचे पूजन करण्याच्या ठिकाणी सनातनचे सद़्गुरु आणि संत यांची वंदनीय उपस्थिती होती. त्यामुळे तेथील वातावरण चैतन्यमय झाले होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर तेथील वातावरण आणखी चैतन्यमय झालेे. त्या महालक्ष्मी देवीसारख्या दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते. त्या हास्यातून त्या ‘सर्व साधकांची साधना चांगली होईल आणि लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन साधक हिंदु राष्ट्र पहातील असे आश्वस्त करत आहेत’, असे मला वाटले.
२. पूजेच्या ठिकाणी ‘साक्षात् श्रीविष्णु उपस्थित असून संपूर्ण सृष्टी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत आहे आणि परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे जाणवणे
पूजनाच्या वेळी आकाशात गरुडाचे दर्शन झाले. तेव्हा ‘पूजेच्या ठिकाणी साक्षात् श्रीविष्णु उपस्थित आहे आणि निसर्गही प्रसन्न होऊन आशीर्वाद देत आहे’, असे मला वाटत होतेे. पूजन होत आल्यावर ढगांमधून सूर्यकिरण दिसले आणि त्याच वेळी चंद्रोदयही झाला. त्यामुळे हे नयनमनोहर दृश्य पहातांना ‘संपूर्ण सृष्टी प्रसन्न झाली असून ईश्वराचा आशीर्वाद मिळत आहे’, असे मला जाणवले. पूजनाच्या ठिकाणी मला ‘सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची उपस्थिती आहे’, असेही जाणवले. त्या वेळी ‘जयतु जयतु हिन्दुुराष्ट्रम् ।’ अशा घोषणा दिल्याने ‘जगभरात लवकरच हिंंदु राष्ट्र येईल’, असे मला वाटले.
३. धर्मध्वज पूजनाचा अविस्मरणीय सोहळा पाहून मनावरील ताण न्यून होणे आणि मन कृतज्ञतेने भरून येणे
‘धर्मध्वजाचे पूजन पहायला मिळणे’, ही माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय घटना आहे. ‘जीवनभर ती माझ्या स्मरणात राहील आणि त्यातून मला साधना करण्याची शक्ती मिळेल’, असे मला वाटते. हा अभूतपूर्व सोहळा पाहून माझ्या मनावरील ताण न्यून झाला आणि मन कृतज्ञतेने भरून गेले.
हा सोहळा पहाण्याची संधी दिल्याबद्दल श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. तनुश्री साहा, कोलकाता, बंगाल. (१३.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
हे पण वाचा :
श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण !