सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे
१. ज्याला समजून घ्यायचे असेल, तो समजून घेतो. मायेतल्यांना समजावून सांगता येत नाही. ‘आपल्या मुलाने किंवा मुलीने साधना करावी’, असे एकातरी (मायेतील) आईला वाटते का ? आई-वडील किंवा नातेवाईक ‘विवाह कर’, असे मायेतील सांगतांना आपण ‘हो’, असे न म्हणता ‘हूं’ म्हणत (केवळ प्रतिसाद देत) ऐकत रहायचे. पुढे त्यांना ‘आपण ‘विवाह कर’, यासारखे मायेतील काही सांगितलेले याला किंवा हिला आवडत नाही’, असे वाटून ते आपल्याला मायेतील सांगणे बंद करतात.
२. मनातील विचारांतील (नकारात्मक विचार इत्यादींतील) चढ-उतार आध्यात्मिक उपाय सांगणार्यांना वेळोवेळी सांगायचे. नामजप बसून न झाल्यास उभे राहून करायचा आणि उभे राहून होत नसल्यास फेर्या मारत करायचा.
३. साधनेसाठी करायचे प्रयत्न बाह्यमन आणि बुद्धी यांच्या स्तरावर ठाऊक असूनही आध्यात्मिक त्रासांमुळे तसे प्रयत्न होत नाही, तर त्या प्रयत्नांसंबंधी सूत्रे वाचून तसे प्रयत्न करायचे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले