श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या गौरव विशेषांकाविषयी पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने काढलेल्या गौरव विशेषांकाच्या संदर्भात ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. विशेषांक हातात घेतल्यावर त्यांतील चैतन्य संपूर्ण देहात जात असल्याचे आणि अनाहतचक्रावर आनंदाची स्पंदने जाणवणे
‘मी विशेषांक हातात घेतल्यावर ‘मला काय जाणवते ?’, हे अनुभवत होते. त्या वेळी ‘माझ्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले आणि माझ्या अनाहतचक्रावर आनंदाची स्पंदने जाणवली. हा आनंद मला संपूर्ण विशेषांक वाचतांना अनुभवता येत होता.
२. विशेषांकाचे प्रत्येक पान उलटतांना ‘चैतन्याचा दैवी झोत माझ्याकडे येत आहे’, असे जाणवणे
मी विशेषांकाची पाने उलटू लागल्यावर ‘साक्षात् श्री महालक्ष्मीमातेच्या तत्त्वाच्या चैतन्याचीच पाने उलटत आहे आणि प्रत्येक पान उलटतांना चैतन्याचा दैवी झोत माझ्याकडे येत आहे’, असे मला जाणवत होते. ‘प्रत्येक पानातून गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) काही ना काही शिकवणार आहेत’, असेही मला वाटले.
३. ‘सच्चिदानंद परब्रह्म
डॉ. आठवलेे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी केवळ ‘कृतज्ञता’ ही चारच अक्षरे अर्पण करू शकतो’, असे वाटून भाव जागृत होणे
‘विशेषांकातील तिसर्या पृष्ठावरील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याबद्दल लिहिलेले गौरवोद़्गार वाचत असतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) आणि श्रीसत्शक्ति बिंदाताई यांच्या चरणी ‘कृतज्ञता’ ही चारच अक्षरे अर्पण करू शकतो’, असे वाटून माझ्या अंतर्मनात भाव जागृत झाला.
४. ‘अंकातील पृष्ठ क्रमांक ७ वरील छायाचित्र १ मधील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंकडून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
– गुरुदेवांचे आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे), पुणे (२५.९.२०२२)
अनुभूती टंकलेखन करतांना सौ. स्नेहल पाटील यांना आलेल्या अनुभूती
६७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढलेल्या गौरव विशेषांकाच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचे टंकलेखन करतांना मला पुढील अनुभूती आल्या.
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भावपूर्ण स्मरण होत होते.
२. प्रार्थनाने लिहिलेल्या सूत्रांनुसार छायाचित्रे पहातांना मला सुगंधाची अनुभूती आली आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
३. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंची छायाचित्रे सजीव झाली आहेत’, असे मला जाणवले.
४. ‘नवरात्रीच्या मंगलमय कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या रूपात साक्षात् देवीचे दर्शन झाले’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’
– सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), पुणे (२.१०.२०२२)
हे पण वाचा :सनातन प्रभात
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |