परदेशी विद्यापिठांना भारतात शिक्षण संकुल उभारणे आव्हानात्मक !
पुणे – परदेशी विद्यापिठांना थेट भारतामध्ये शिक्षण संकुल चालू करणे आव्हानात्मक आहे; मात्र परदेशी विद्यापिठांनी भारतीय विद्यापिठांशी परस्पर सहकार्य करार करूनच अभ्यासक्रम राबवणे अधिक योग्य होईल, असे मत पद्म पुरस्कारप्राप्त डॉ. दीपक धर, प्रा. के.एन्. गणेश यांनी व्यक्त केले. ते ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या वतीने (आयसर) डॉ. दीपक धर आणि प्रा. गणेश यांचा सत्कार करण्याच्या प्रसंगी बोलत होते.
प्रा. गणेश म्हणाले की, विद्यापीठ चालू करण्यासाठी भूमीपासून ते पाणीपुरवठ्यापर्यंत अनेक अनुमती घेण्याची प्रक्रिया ही फार पुष्कळ आहे. येथील कार्यसंस्कृती आणि प्रशासन समजणे अवघड आहे. त्यापेक्षा भारतीय विद्यापिठांशी करार करत अभ्यासक्रम राबवणे सोपे होईल.