‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या प्रचाराच्या गाडीचे उद़्घाटन !
कोल्हापूर – ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या प्रचाराच्या गाडीचे उद़्घाटन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, शिवसेना खासदार (शिंदे गट) धैर्यशील माने, तसेच माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रचार गाडीच्या माध्यमातून गावागावांत सुमंगलम् कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार जलद गतीने होणार आहे.