दिव्य आणि पवित्र गंगाजलाविषयी विदेशातील वैज्ञानिकांचे मत !
१. ‘गंगेच्या पाण्यामध्ये पटकीचे (‘कॉलरा’चे) रोगांचे जंतू ६ घंट्यांमध्ये नष्ट होतात’, असे डॉ. हॅकिन्स यांनी केलेल्या चाचणीवरून सिद्ध होणे
‘वैज्ञानिक चाचणीवरून समजते, ‘गंगाजलाने स्नान करणे आणि ते प्यायल्यामुळे पटकी (कॉलरा), प्लेग, मलेरिया आणि क्षय (टीबी) इत्यादी रोगांचे जंतू नष्ट होतात.’ या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी एकदा डॉ. हॅकिन्स ब्रिटीश सरकारच्या वतीने गंगाजलाने दूर होणार्या रोगांची चाचणी करायला आले होते. त्यांनी चाचणीसाठी गंगाजलात पटकीचे (कॉलरा) जंतू टाकले. पटकीचे जंतू केवळ ६ घंट्यांतच मेले आणि जेव्हा त्या जंतूंना सर्वसाधारण पाण्यात ठेवले, तर ते जीवित राहून त्यांची असंख्य पटीने वृद्धी झाली. तसे पहायला गेले, तर ‘गंगाजल विविध रोगांना नष्ट करणारे ‘जंतूनाशक जल’ आहे.’
२. फ्रान्सचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. हॅरेन यांनी गंगाजलातून ‘जंतूंपासून संरक्षक’ नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण औषधी घटक बाजूला काढणे
फ्रान्सचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. हॅरेन यांनी गंगाजलावर अनेक वर्षे संशोधन करून आपल्या प्रयोगांचे निष्कर्ष संशोधन लेखांंच्या रूपात सादर केले. त्यांनी मानवाच्या आतडीचे संशोधन केले आहे. त्यांनी पटकीने मृत झालेल्या अज्ञात लोकांच्या शवांना गंगाजलात अशा स्थानी टाकले की, जेथे या जंतूंची वाढ जलद गतीने होऊ शकते. डॉ. हॅरेन यांना आश्चर्य वाटले की, काही दिवसांतच या शवांच्या आतड्यांचे संशोधन केल्यावर केवळ पटकीचेच रोगजंतू नाही, तर अन्य रोगांचे जंतूही नष्ट झाले होते. त्यांनी गंगाजलातून जंतूंपासून संरक्षक (बॅक्टीरियासेपफेज) नावाचा एक घटक बाजूला काढला, ज्यामध्ये औषधी गुण होते.
३. इंग्लंडचे सुप्रसिद्ध चिकित्सक सी.ई. नेल्सन यांनी गंगाजलावर संशोधन करतांना लिहिले आहे, ‘या पाण्यात सडणारे जंतू नसतात’. त्यांनी महर्षि चरक यांचा उल्लेख करत लिहिले की, गंगाजल खर्या अर्थाने पाचक आहे.
४. वर्ष १६५० मध्ये रशियाच्या वैज्ञानिकांनी हरिद्वार आणि काशी येथे स्नान केल्यानंतर म्हटले, ‘‘आम्हाला प्रत्यक्ष गंगास्नान केल्यानंतरच समजले की, भारतीय लोक गंगेला एवढे पवित्र का मानतात ते ?’’
५. ‘गंगाजलाला औषधीय गुणवत्ता कशा प्रकारे प्राप्त होेते ?’, हे कॅनडाच्या मॅकिलन विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक डॉ. एम्.सी. हॅमिल्टन यांनाही न समजणे
गंगाजलाच्या पाचकतेविषयी ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये हस्तलिखिताचे कागद ठेवले आहेत. कॅनडाच्या मॅकिलन विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक डॉ. एम्.सी. हॅमिल्टन यांनी गंगेच्या महानतेला मान्यता देत म्हटले, ‘‘मला ठाऊक नाही की, या पाण्यामध्ये एवढे अपूर्व गुण कुठून आणि कसे आले आहेत?’’ हे खरे आहे की, हॅमिल्टन वास्तवात समजूच शकले नाहीत की, गंगाजलाला औषधीय गुणवत्ता कशा प्रकारे प्राप्त होेते ?
६. ‘गंगा नदी अपूर्व आहे’, असा निष्कर्ष देश-विदेशातील अनेक विद्वानांनी काढणे
आयुर्वेदाचार्य गणनाथ सेन, विदेशी प्रवासी इब्नबतूता, वर्नियर, इंंग्रजांच्या सेनेचे कॅप्टन मूर, शास्त्रज्ञ डॉ. रिचर्डसन इत्यादी सर्वांनी गंगेवर संशोधन करून शेवटी हाच निष्कर्ष दिला की, गंगा नदी अपूर्व आहे.
(साभार – साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ६ ते १२ डिसेंबर)