जम्मूमधील हिंदू करत आहेत बंदुका चालवण्याचा सराव !
जिहाद्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी घेतला निर्णय
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी हिंदूंनी सिद्धता चालू केली आहे. डांगरी येथील स्थानिक हिंदू आणि शीख यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुका बाहेर काढल्या असून ते बंदुका चालवण्याचा सराव करत आहेत. २० वर्षांपूर्वी ग्रामस्थांना पोलिसांनी स्वरक्षणासाठी ७१ बंदुका पुरवल्या होत्या. ग्रामस्थांकडून त्या बंदुका आता उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हिंदुओं ने इस्लामी आतंकी हमलों का जवाब देने की तैयारी कर ली है। गाँव के लोगों ने 71 राइफलें निकाली। ये हथियार 20 साल पहले पुलिस ने इन्हें सुरक्षा के लिए दिया था।
गाँव के लोग निशाना लगाने की लगातार प्रैक्टिस कर रहे हैं।#HindusUnderAttack #JammuKashmirhttps://t.co/5mU9wO5ZyL
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 4, 2023
अलीकडेच म्हणजे १ जानेवारी २०२३ या दिवशी आतंकवादी या गावात घुसले आणि त्यांनी गावातील ५ हिंदूंची हत्या केली होती. त्या वेळी त्यांनी केलेल्या बाँबस्फोटात २ मुलेही ठार झाली होती. त्या वेळी गावातील बाळकृष्ण शर्मा यांनी आतंकवाद्यांवर गोळीबार केला होता. त्यामुळे आतंकवाद्यांनी तेथून पळ काढला होता. वर्ष १९९८ ते २००१ या कालावधीत पोलिसांनी काही लोकांना सुरक्षेसाठी बंदुका पुरवल्या होत्या. शर्मा हे त्यांपैकी एक आहेत. गावातील लोकांची हत्या झाल्यानंतर तेथील हिंदू संतप्त झाले आहेत. अशा प्रकारे आतंकवाद्यांनी गावावर पुन्हा आक्रमण करू नये, यासाठी तेथील हिंदू बंदुका चालवण्याचा सराव करत आहेत.
संपादकीय भूमिका
|