येत्या गुढीपाडव्यानंतर निसर्गाचा प्रकोप होणार !
|
बागलकोट (कर्नाटक) – येत्या गुढीपाडव्यानंतर निसर्गाचा प्रकोप होणार आहे, असे भाकीत कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र महास्वामीजी यांनी केले आहे.
जमखंडी येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, करू नये, ते केल्याने घडू नये, ते घडते. कुणीही चूक असो, बरोबर असो, आपण जे करतो, तसेच घडते. आपण जे पेरतो, तेच उगवते. पुढच्या खेपेलाही राज्यात अस्थिरता असेल. सर्व पक्षांमध्ये फाटाफूट होण्याची लक्षणे आहेत. निवडणुकीपर्यंत पक्षांतर होईल. राजकीय पक्ष फुटतील; परंतु एक पक्ष सत्तेवर येईल. जेवढे सुख तेवढेच दुःख असेल. चूल पेटून जळत असतांना ती विझवू शकतो; परंतु वणवा पेटल्यास तो विझवणे शक्य नाही.